शेगाव (बु) येथील ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीटलाईटची लाईन एम.एस.इ.बि.नि कापली
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न8308264808
शेगाव बु येथील ग्रामपंचायतच्या थकीत करामुळे ग्रामपंचायत हद्दीतील येणारे संपूर्ण स्ट्रीटलाईटची लाईन गुरुवार पासून एम. एस. ई.बि. ने कापली आहेत. मागील काही वर्षांपासून शेगांव (बु.) ग्रापंचायतीने महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक बोर्ड यांचा लाखो रुपयांचा कर थकीत असल्याने कापण्यात आली. सहाय्यक अभियंता श्री. वैभव जुमडे यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतनी रेगुलर कर भरणा केल्यास आम्ही तत्काळ लाईन सुरू करू अशी त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक बोर्डाने दिलेल्या आदेशनुसार सदर कारवाही झाली असून आता किती दिवसात सुर होईल याची चिंता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे....
