शेगांव ग्रामपंचायत परिसरात घाणीचे साम्राज्य
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो,न,8308264808
स्थानिक शेगाव येथील पाण्याच्या टाकीचे वॉल लिकीजमुळे बाजारपेठेत असलेल्या गाळ्यामधील दुकाना समोरून पाण्याच्या टाकीचे ओव्हरफ्लो पाणी तसेच वॉल लिकीजचे पाणी मागील एक महिन्यापासून सतत वाहत आहे आणि या ठिकाणी सोमवारला बाजारपेठ भरत असून भाजीपाला विक्रेत्यांना बसायला अडचण सुद्धा होत असते आणि तिथे टाकीच्या वाहत्या पाण्यामुळे तसेच कचरा पेटी नसून घाणीचे प्रमाण जास्त वाढलेले दिसून येत आहे. सदर इथे गंधगी आणि रोज सतत वाहत असलेले पाणी या बद्दल ग्रामपंचायतला लेखी माहिती देण्यात आली व तसेच मोबाईल फोनवर सुद्धा बोलणं झालं परंतु याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे.मागील एक महिन्यापासून पाण्याच्या टाकीचे वॉल लिकीज असून भरलेल्या टाकीचे पाणी गावातील नागरिकांना एकतर प्यायला पाणी मिळत नाही आणि यांच्या निशकाळजीपणामुळे पिण्याचे पाणी वाया जात आहे. परिसरीतील दुकानदार ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणमुळे त्रस्त झाले आहेत तसेच त्या भागात जाणे येणे करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे त्यांची अशी मागणी आहे की ग्रामपंचायतने याचे काम करून साफसफाई करून द्यावी जेणे करून आम्हाला कर भरायला भविष्यात नाही म्हणता येईल. आता या विषयावर सर्व दुकानदार तथा नागरिकांचे लक्ष लागले आहे......

