मार्कंडा देवस्थान च्याविकासासाठी निधीची तरतूद करा मंदिर जीर्णोद्धार चे काम तातडीने पूर्ण करा - खासदार अशोक नेते यांची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी

 मार्कंडा देवस्थान च्याविकासासाठी निधीची तरतूद करा मंदिर जीर्णोद्धार चे काम तातडीने पूर्ण करा - खासदार अशोक नेते यांची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी

संदीप कांबळे गडचिरोली 

शहर प्रतिनिधी 9421318021

चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानच्या विकासासाठी मंजूर निधी पुरातत्व विभागाने त्वरीत उपलब्ध करून द्यावी व मार्कंडा जीर्णोद्धार चे काम यथशिग्र पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथे पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.


खासदार अशोक नेते यांनी आज दि. 11 आगस्ट रोजी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मार्कंडा देवस्थानच्या विकासाबाबत व निधीच्या तरतुदी बाबत सविस्तर चर्चा केली. तसेच मार्कंडा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबाबत विचारणा केली असता बांधकामाच्या इस्टीमेट मधील तांत्रिक अडचणी मुळे कामात विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खासदार अशोक नेते यांनी देवस्थानच्या विकासासाठी निधीची तरतूद तात्काळ करण्यात यावी तसेच मार्कंडा देवस्थान या पर्यटन स्थळाच्या पुढील नियोजनाच्या स्थितीबाबतही विचारणा केली. लवकरच निधीची तरतूद करून मार्कंडा देवस्थानचा विकास करण्याची ग्वाही पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांना दिली. यावेळी गडचिरोली भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, सावलीचे तालुका अध्यक्ष अविनाश पाल उपस्थित होते.

    

      

     

 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler