जिल्ह्यातील माता भगिनींनी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यावा,

जिल्ह्यातील माता भगिनींनी केंद्र सरकारच्या कौशल्य  विकास योजनांचा लाभ घ्यावा,

आमदार डॉ देवरावजी होळी

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी


मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आँनलाईन उपस्थितीत झालेल्या आत्मनिर्भर नारीशक्तीच्या कार्यक्रमात आमदार डॉ देवरावजी होळी यांची आवर्जुन उपस्थिती,जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले मोलाचे मार्गदर्शन

''आझादी का अमृत महोत्सव" या कार्यक्रमांतर्गत सहभागी एन आर एल एम आत्मनिर्भर माता भगिनींशी संवाद साधतांना मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे असून  जिल्ह्यातील माता भगिनींनी आत्मिनिर्भर होण्यासाठी  केंद्र सरकारच्या कौशल्य  विकास योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले आहे

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे  भारत सरकारच्या एन.आर. एल.एम. अभियानातील जुळलेल्या  महिलांशी  सुसंवाद "आझादी का अमृत महोत्सव" या  कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला  आमदार डॉ देवराव जी होळी आवर्जून उपस्थित होते. यावेळी मा. जिल्हाधिकारी दिपकजी सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद , अभियानातील अधिकारी व  अभियानांतर्गत जुडलेल्या महीला उपस्थित होत्या.

केंद्रातील नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आलेल्या केंद्र सरकारने देशातील गरीब लोकांचे बँकेत खाते काढले.   देशात जवळपास ४२ कोटी खाते काढले गेले. त्यात जवळपास ५५% महिलांचे बँक खाते आहेत. आज ते बँक खाते त्यांना व्यवसायातही कामी येत असून  त्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमाआहेत. आता देशातील मातृशक्ती स्वयंरोजगारातून  पुढे येत असून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावित आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहेत.

आज उमेद च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिला सुद्धा उद्योग-व्यवसायात पुढे येत असून. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनांचा त्यांनी पुरेपूर लाभ घेऊन स्वतः चा व आपल्या कुटुंबाचा  विकास साधावा असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler