पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विधवा महिला श्रीमती सुनीता येमुर्ले प्रहार तर्फे मदत....

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विधवा महिला श्रीमती सुनीता येमुर्ले प्रहार तर्फे मदत....


वरोरा तालुका ग्रामिण प्रतिनिधि

राकेश भुतकर मो,न,8308264808


आज दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मौजा पारोधी येथील  विधवा महिला श्रीमती सुनीता येमुर्ले या महिलेला प्रहार जनशक्ती पक्ष शेगांव तर्फे मदत करण्यात आली. सदर महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून पारोधी येथील प्रहारचा कार्यकर्ता सुहास चौधरी यांनी आम्हाला माहिती दिली. माहिती मिळताच पक्षाचे कार्यकर्ते त्यांना भेटून माहिती घेतली आणि भविष्यात तुमच्या परिवाराला मदत करू अशे आश्वासन दिले. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे  राज्यमंत्री मा. ना. बचुभाऊ कडू यांच्या विचारांवर विधवा महिलेला मदत केली. सध्या त्यांना गहू व तांदूळ आणि आर्थिक मदत असेच साडी देऊन सहकार्य केले तथा येत्या १०-१५ दिवसात किराणा सामान व कपडे घेऊन देऊ याची ग्वाही दिली. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिली आहे अशे गावकऱ्यांना वाटले. त्यामुळे पारोधी गावातील नागरिकांना आपलंसं वाटलं आणि आता प्रहार जनशक्ती पक्षा सोबत जुळण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते अक्षय बोंदगुलवार, शेरखान पठाण, महिला आघाडी प्रमुख सौ. गिताताई फुलकर, राकेश भूतकर, आकाश नाकाडे, आशिष ताजने, सुहास चौधरी व गावातील पुरुष व महिला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler