क्रांतिकारी विर शहीद बाबुरावजी शेडमाके हे तरुणांसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान
आमदार डॉ देवरावजी होळी,,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली येथील क्रांतिकारी विर शहीद बाबुरावजी शेडमाके यांच्या प्रतिमेला अभिवादन
दिनांक ९ ऑगस्ट २०२१ गडचिरोली
इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, बलाढ्य अशा ब्रिटिश राजवटीला हादरा देणारे महान क्रांतिकारक विर शहीद बाबुरावजी शेडमाके हे तरुणांसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील विर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना केले.
९ ऑगस्ट क्रांतिकारी तथा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. वीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतमातेला मुक्त करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यांना सळो कि पळो करून सोडले. अखेर इंग्रजांनी त्यांना फितुरीने अटक केली २१ ऑक्टोंबर १८५८ ला त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली गेली. फाशीची शिक्षा झाली असताना सुद्धा त्यांना त्याचे दुःख झाले नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे, आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा अशीच इच्छा त्यांनी आपल्या हृदयात कायम ठेवली. त्यांचे हे कार्य आजच्या तरुणांना स्फूर्ती देणारे असून ते तरुणांसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी यावेळी केले.

