ब्रेकिंग:- वाघाच्या हल्यात बैल ठार चिमुर तालुक्यातील वाघेडा परीसरातील घटना,
चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
चिमुर तालुका अंतर्गत येत असलेल्या वाघेडा येथील शालीक दडमल यांच्या मालकीच्या बैलावर मध्यरात्री कुणीही नसल्याचे संधी साधुन वाघाने बांधलेल्या बैलावर हमला करुन बैलाला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना सामोरं आली आहे काही दिवसांपूर्वी या परिसरात अस्वलीने सतत धुमाकूळ घातला होता मात्र अस्वलीची दहशत थोडीशी कमी होत नाही तर वाघाची दहशत चालु झाल्याचे दिसून येत आहे या घटनेमुळे वाघेडा परीसरातील गावकरी चींतेत असल्याचे दिसून येतो या वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी गावकरांची मागणी आहे
