सेवाभावी जनसेवेचे ब्रीद, सामान्यांचा आधार म्हणजे युवक काँग्रेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर उसेंडी यांचे युवक काँग्रेस स्थापना दिनानिमित्त प्रतिपादन.
गडचिरोली शहर प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
युवक काँग्रेसच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ग्रामीण भागातून एक मोठी चळवळ उभी करता आली त्यासाठी युवक काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ, नामदेव उसेंडी यांनी गडचिरोली शहरात आयोजित केलेल्या युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विचार व्यक्त केले .भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवक काँग्रेसचा आज स्थापना दिवस निमित्ताने गडचिरोली शहरातील जिल्हा काँग्रेस कार्यालयात आपला स्थापना दिवस ध्वजारोहन करून साजरा करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. उसेंडी यांनी जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच युवक काँग्रेस तथा जिल्हा काँग्रेस तथा विद्यार्थी संघटना या तिघांनीही नवीन भारत घडविण्यासाठी आपापल्या क्षेत्रात जोमाने कार्य करावे असे आवाहनही केले.
विशेष करून कोरोना महामारी च्या काळात युवक काँग्रेसने कोरोना बाधित त्यांच्या नातेवाईकांची जी सेवा केली त्याचे कौतुक करून काँग्रेसचे सेवाभावी रूप जागृत ठेवण्याचे कार्य युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने केल्याने त्यांचा सत्कारही करण्यात आला.
सदर कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,माजी जिल्हाध्यक्ष हसन भाई गिलानी, सेवादल चे बैसजी,देवाजी सोनटक्के सर, पांडुरंग घोटेकर,शहर अध्यक्ष सतीश विधाते ,अनुसूचित जाती सेल रजनीकांत मोटघरे,नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर,काशिनाथजी भडके ,नेताजी गावतुरे, घनश्याम वाढई,राकेश रत्नावार,जितेंद्र पाटील मुनघाटे ,एजाज शेख,आशिष कामडी,अनिल कोठारे,नामदेव उडान,कुणाल पेंदोरकर,नितेश राठोड,घनश्याम मुरवतकर,विपुल एललेट्टीवार,पंकज बारसिंगे,योगेश नैताम, सुरज कोडापे,समीर ताजने,निखिल खोब्रागडे, नीता वाडडेट्टीवार,विजय चिळगे, कुणाल ताजने,शरद निकुरे,मयूर गावतुरे,सह युवक काँग्रेस, काँग्रेस, महिला काँग्रेस,सेवा दल,सोशल मीडिया, एन एस यु आय कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सतीश विधाते तर आभार सूरज कोडापे यांनी मानले,

