जिल्ह्यात प्रथमच होत आहे सेवा हमी कायद्याची मागणी
तालुका प्रतिनिधी वरोरा
गणेश उराडे
8928860058
वरोरा महाराष्ट्रात सेवा हमी कायदा लागू झाल्यास आज सहा वर्ष पूर्ण झाले तरी हा कायदा बहुतांश लोकांपर्यंत पोहचला नाही या कायदा अंतर्गत फक्त अमरावती जिल्हातील दर्यापूर तालुक्यातील दोन अधिकाऱ्यावर या कायद्याची अंमलबजावणी झाली तेथील नायब तहसीलदार यांच्या वर कार्यवाही करून निलंबित करण्यात आले. हा कायदयात अशा तरतूद केल्या आहे की कोणत्याही अधिकाऱ्या कडे काही बाबी साठी तक्रार केली असता त्या तक्रारीचे सात दिवसाच्या आत निवारण झाले पाहिजे असा हा कायदा मणतो काही अधिकारी मुजर असून जनतेची पिळवणूक करतात अशीच एक घटना वरोरा तालुक्यातील आटमुर्डी गट ग्राम पंचायत मध्ये आली असून सदर गावातील काही नागरिक यांनी आपल्या तक्रारी सचिव यांच्याकडे केल्या पण आज पर्यंत त्या तक्रारीचे निवारण करण्यात आले नाही सदर बाब प्रहार सेवक तसेच माजी तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांना माहित होताच मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन मागणी केली सदर हा प्रकार जिल्ह्यात प्रथमच जनतेच्या कानी पडल्या मुळे जनतेमध्ये हा कायदा गाव पातडीवर प्रशासनाने माहिती पुरवावी अशी मागणी होत आहे
