जालना जिल्ह्यातील पिरकल्याण गावात पुन्हा एकदा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रभावी मार्गदर्शनात साजरी_
प्रविण हिवाळे,
जालना तालुका प्रतिनिधी,
मो.9156204245
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चलचिकित्सालय जालना ग्रामीणआरोग्य प्रकल्पांतर्गत
पिरकल्याण गावात पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती उत्साहात संपन्न झाली.
दिनांक 3 ऑगस्ट 2021 वार मंगळवार रोजी पिरकल्याण येथे जगविख्यात ज्ञान पुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आलेले प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बलदेवजी महाराज गिरी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेडिकल सोशल वर्कर पवन पोपळघट यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्रजी काळे यांनी केले प्रमुख व प्रकल्प समन्वयक लोकशजी पंचवटकर यांनीही मार्गदर्शन केले तसेच विलासजी आघाम यांनी ही मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आभार मेडिकल सोशल वर्कर पवन पोपळघट यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास ए एन एम सीमा सोनवणे वाहन चालक रघुनाथजी नाईकवाडे पिरकल्याण गावचे प्रथम नागरिक सरपंच आजम शेख उपस्थित होते उपसरपंच भुतेकरजी उपस्थित होते तसेच गावचे पोलीस पाटील उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी वाघमारे व विलासजी हिवाळे तसेच गावातील अन्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रम अतिशय छान व सुंदर झाला या कार्यक्रमास अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नवीन प्रण करण्यात आला पुढील जयंती पर्यंत वस्तीतील कोणतीही व्यक्ती व्यसन करणार नाही व्यसन न करणाऱ्या अशा व्यक्तीचा जाहीर सत्कार करण्यात येईल अशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला

