नागभीड येथील खुनी थरार धारदार हत्याराने प्रियकराने केले विवाहित प्रियसीवर वार प्रीयसीचा जागीच म्रुत्यु,

नागभीड येथील खुनी थरार धारदार हत्याराने  प्रियकराने केले विवाहित प्रियसीवर वार प्रीयसीचा जागीच म्रुत्यु, 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे, 7030115037

नागभीड:- पतीशी पटत नसल्याने आणि  पती सोबत मतभेद झाल्यावर पत्नी माहेरी येऊन राहू लागली  , मात्र माहेरी तिचे संबंध दुसऱ्या तरुणांशी जुळले, परंतु काही दिवसानंतर त्यांच्यात सुद्धा वादाची ठिणगी पडली वाद वाढू लागले व दोघात भांडणे होऊ लागले  तरुण प्रियकराने हा  राग मनात घेतला होता आणि अचानक प्रियशी ला संपवण्याचा विचार मनात करून त्या तरुण  प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या घरी जात तिच्या गळ्यावर धारधार हत्याराने  हल्ला केला यामध्ये विवाहित प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटना ही दि 13 आगस्टला घडली  गतप्राण झालेली  विवाहित महिला 28 वर्षीय पूजा रवींद्र सलामे हीचा विवाह चिखल परसोडी येथील  युवकासोबत झाला होता.मात्र नवऱ्याशी मतभेद झाल्याने पूजा ने नागभीड येथे असलेलं माहेरी राहायला आली होती  काही दिवस माहेरी राहिल्यावर परसोडी येथील  तरुण विवेक ब्रह्मदास चौधरी वय 25 वर्षे याच्या सोबत पुजाचे प्रेमसंबध जुळले.मागील काही दिवसांपूर्वी पूजा व विवेक यांचं काही कारणावरून भांडण झाले होते, नेहमीचे भांडणाचे कारण काय हे विचारण्यासाठी  विवेक पूजाच्या घरी जाऊन जाब विचारायचे ठरवले होते  तो दिवस निघाला आणि विवेक पूजाच्या घरी गेला , त्यावेळी पूजा एकटीच घरी होती  पुजाची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती त्यामुळे घरी कुणीही नसल्यामुळे विवेकला  संधी चालून आली  याचाच फायदा घेत विवेकने  पूजाच्या गळ्यावर धारदार हत्याराने  वार केले. 

अचानक झालेल्या हल्ल्यात पूजाचा जागीच म्रुत्यु झाला , आरोपी विवेक घटनास्थळावरून पसार झाला आणि सरळ पोलीस स्टेशन गाठून आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची सांगून  गुन्हाची कबूल दिली .नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोरवते यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत,आरोपी विवेक वर कलम 302,452 भादवी सहकलम 3(2)(5) अनु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारीत 2015 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक माडामे यांच्या मार्गदर्शनाखाली  होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler