चिमुर तालुक्यातील सावरी (बी )येथील जि.प.उच्च शाळेचा अनोखा उपक्रम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
चिमुर:-पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत (इयत्ता ५वी) परिक्षेत बसविले सर्व विद्यार्थी मौजा सावरी (बिड ) येथिल जि.प.उ.प्र.शाळेत इयत्ता ५वी मध्ये एकूण १५विद्यार्थी असून १५ विद्यार्थी परिक्षेत बसविले मागील वर्षापासून जरी कोरोना १९ मुळे शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी मात्र श्री.विलास हिवंज मुख्याध्यापक यांनी स्वतः शिष्यवृत्तीचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यां कडून भरपूर सराव करुन घेतला आहे सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. मागील वर्षी या शाळेचे दोन विद्यार्थी परिक्षेत पास झाले हे विषेश या उपक्रमाचे कौतुक श्री.मेश्राम साहेब गटविकास अधिकारी चिमूर विस्तार अधिकारी सौ.सिमा राऊत, तसेच केंद्रप्रमुख श्री अमृतकर साहेब यांनी केले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.शिटीताई सातपैसे ,सौ.मनिषाताई निखाडे उपाध्यक्ष ,रवि शेन्डे , सुरेश मेश्राम यांनी सहकार्य करून मोलाचा वाटा उचलला आहे,

