भारतातील तेरा युवा निर्मात्यांच्या यादीत विनायक काकड ची निवड.....
संपादक ओम जायभाये -7058807386
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील छोटेसे गाव चिखला येथील विनायक काकड ने गावाचेच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशामध्ये ठळकपणे चमकावले आहे. जगातील नामांकित अशोका आणि कनेक्टिंग ड्रीम्स फाउंडेशन या संस्थांच्या ‘चेंज मेकर फोर ग्राम स्वराज्य’ या फेलोशिप साठी सुमारे 800 युवनिर्मत्यांमधून पाच अतिशय कठीण निवड चाचण्यांमधून 13 युवनिर्मत्यांची यादी समोर आली. त्यामध्ये विनायक ची अप्रतिम कामगिरी, त्याची मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर विनायक ने अंतिम यादीत स्थान मिळवलं. विनायक चे आईवडील हे दोन्ही सुद्धा वयोवृद्ध तथा पूर्णतः शेतीवर अवलंबून असणाऱ्या हलाखीच्या शेतकरी कुटुंबातून विनायक आहे. तरी सुधा त्याची ही राष्ट्रीयपातळीवरील मजल खेड्या भागातील विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी प्रेरणा ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अश्या संस्थांमध्ये निवड होणे फार गरजेचे आहे. पण आणखी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां जगृक्तेच्या अभावी अशा उपक्रममध्ये फार कमी आढळून येतात.पण ही अज्ञानतेची चौकट ओलांडत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर विनायक एक नवीन आदर्श ठरला आहे. व अश्या संस्थांच्या फेलोशिप उपक्रमांमध्ये आपल्या ग्रामीण भागातील विनायक सर्वात कमी वयाचा पहिला फेलो आहे. विनायक च वय अवघ सतरा वर्ष असून तो बारावीमध्ये शिकत आहे.विनायक : “येणाऱ्या काळात माझ्या फेलोशिप च्या सहायाने ज्या शैक्षणिक, क्रीडा समाजसेवा,यामधील नावीन्य पूर्ण संधी शहरी भागातील विद्यार्थ्यांन प्रर्यंतच सीमित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील त्याचा लाभ होईल यासाठी काम करेल व वैदकिया, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षा या पलीकडे देखील असंख्य शिक्षणाची द्वार आपल्यासाठी आहेत पण ते आपण ठोठावत नाही आहोत. तीच द्वार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उघडी करण्याचा प्रयत्न करेल.आणि भविष्यामध्ये माझ्या गावसाठी आणि ग्रामीण भागासाठी खूप काही स्वप्न आहेत ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करेल. माझ्या या यशामध्ये राजू केंद्रे, एकनाथ वाघ,आणि एकलव्य संस्था यांचा देखील फार मोलाचा वाटा आहे. तुम्हा सर्वांचे धन्यवाद न मानता तुमच्या ऋणातून मुक्त न होता.ते ऋण फेडण्यासाठी आणखी ताकतीने काम करेल”.
