प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा चे प्रहारसेवक शुभम नरडे यांच्या गाडीची अज्ञात व्यक्ती कडून तोडफोड

प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा चे प्रहारसेवक शुभम नरडे यांच्या गाडीची अज्ञात व्यक्ती कडून तोडफोड

 

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058


वरोरा:- प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरोरा शहराचे प्रहार सेवक यांच्या चारचाकी वाहनाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड केल्याची घटना १२ ऑगस्टला उघडकीस आली.

वरोरा शहरातील विविध उपक्रमात अग्रेसर असणारे शुभम नरडे यांचा वर्ष भरापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षात पक्ष प्रवेश झाला . पक्षाच्या विविध उपक्रमात तसेच आंदोलनात नेहमीच अग्रेसर असणारे नरडे हे स्थानिक बेरोजगारांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते. कदाचित याच गोष्टीचा वचपा काढण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली असावी अशी चर्चा शहरात रंगत  असून १३ ऑगस्टला आज्ञाता विरोधात तक्रार देवूनहीं अजून पावेतो पोलिसांनी साधा पंचनामा ही केला नाही. वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून आरोपींचा शोध लावावा अशी मागणी ज्येष्ठ प्रहार सेवक आशिष घुमे यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler