लोक विद्यालय मोटेगाव येथील नामदेवराव कामडी सर याना सेवानिवृत्ती पर निरोप

लोक विद्यालय मोटेगाव येथील नामदेवराव कामडी सर याना सेवानिवृत्ती पर निरोप


चिमुर तलुका ग्रामीण प्रतिनिधी

सचिन वाघे मो.9673757006


नेरी।नेरीवरून जवळ असलेल्या मोटेगाव येथिल युग प्रवर्तक शिक्षण मंडळ नेरी व्दारा संचालित लोक विद्यालय मोटेगाव येथील जेष्ठ  प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व सामाजिक जाण असणारे सुस्वभावी श्री नामदेवराव तांनबाजी कामडी यांची वयोमानानुसार दि 31 जुलैला सेवा समाप्ती झाली त्यांना निरोप देण्यासाठी विद्यालयाने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक निवृत्ती सत्कार करण्यात आला

          या निरोप संभारंभाला अध्यक्ष म्हणून अरुनजी गोपाळ पिसे अध्यक्ष युग प्रवर्तक सेवा मंडळ नेरी प्रमुख पाहुणे म्हणून एल टी कामडी माजी मुख्याध्यापक सुभाष नेवारे सरपंच मोटेगाव इ का रंदये मुख्यध्यापक नेरी व दा आष्टनकर सेवानिवृत्त शिक्षक ए बी सुकारे मुख्याध्यापक मोटेगाव सौ शालुताई कामडी शिक्षिका सौ पी ए हजारे शिक्षिका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते 

 या कार्यक्रमा प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रजववलन करून सुरवात झाली सर्वात प्रथम या विद्यालयातून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार कामडी सर तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यात कुणाल खोब्रागडे प्रथम गौरव घरत द्वितीय तर आदित्य खोब्रागडे तृतीय यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यानंतर कामडी सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रसंगी अनेक शिक्षकानी व विद्यार्थ्यांनी कामडी सर यांच्या सहवासातील आठवणी ना उजाळा दिला तसेच सत्कारमूर्ती कामडी सरांनी शाळेबद्दल गौरव उदगार काढले आणि शिक्षणाचे कार्य नेहमीच उत्तमरीतीने पुढेही असेच चालावे अशी इच्छा व्यक्त करून सत्काराप्रसंगी आभार व्यक्त केले तसेच पुढील जीवनाच्या टप्प्यात कामडी सर  याचा जीवन  उत्तम आरोग्य भरभराटीचा  जावो अशी सदिच्छा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एल पिपळकर यांनी तर आभार प्रदर्शन बी एल ढोले सर यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler