होणाऱ्या नवऱ्याने पत्नीवर केला लैंगिक अत्याचार
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर मो.9970643453
उमरेड, उच्चशिक्षित तरुणी (वय27) नागपूरमधील खरबी येथील रहिवासी आहे. तर आरोपी नवनीत अशोक बांगळकर (वय 28)हा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी आहे. फरवरी महिन्यामध्ये रितीरिवाजाप्रमाणे लग्न जोडले. व 22 फरवरी 2019 रोजी साखरपुडा देखील पार पडला, पण कोरण्याचा प्रादुर्भावामुळे दोन वेळा लग्न स्थगित करण्यात आले. दरम्यान जून महिन्यात आरोपी व पीडित तरुणी आपापल्या कुटुंबासह करांडला अभयारण्यामध्ये रिसॉर्टमध्ये थांबले, असता आरोपी नवनीत ने तिच्या इच्छा विरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र आरोपी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उमरेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवि कलम 376(1) 417 आन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या शोधात आहे.
