नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार सेवा केंद्र गडचिरोली यांचा पुढाकार
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहर प्रतिनिधी
स्थानिक स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल सेवा केंद्र गडचिरोली यांच्या माध्यमातून इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेमध्ये प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मा. नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता १० वीच्या गुणवंतप्राप्त विद्यार्थिनी कु.नंदिनी पराग दडवे १००%, कु. ट्विंकल दिलीप दडवे ९८ %, कु. विधी राजेश वाणी९२%,साहिल प्रशांत नागुलवार ९२ सोहम शैलेश वाणी ८९%,आदित्य दामोधर नैताम ८९ %, कु. राधा अतुल खड८७%,लखन उमेश काबरा ८० %,अनिरुद्ध फकिरा गड्डमवार ७६ % यांचा तर इयत्ता १२ वीचे विध्यार्थी ओम विवेकबच्चूवार८७%,सोहम शरद देवीकर ८४ %,ऋषभ सुनील दिवसे ७९ % इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर,नगरसेवक सतीश विधाते,स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास व बाल संस्कार सेवा संस्था अध्यक्ष प्रा. दिघडे सर,कन्नमवार वार्ड येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार सेवा केंद्र गडचिरोली यांनी केले.

