चिमुर सीन्देवाही मुख्य मार्गावर नेरी येथे इस्सार पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट
नेरी येथील प्रकार : मशीन ऐवजी मापाचे साहाय्याने विक्री
पंपावर कर्मचाऱ्याचा पेट्रोल चोरीचा लोकांसमोर कबुलनामा
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे 7038115037
नेरी।:- नेरी येथील नेरी नवरगाव मार्गावरील सुप्रसिद्ध इस्सार पेट्रोल पंपावर दि 10 आगस्ट ला पेट्रोल ची विक्री करीत असताना ग्राहकांची लूट करीत असल्याचा प्रकार ग्राहकाच्या दक्षतेमुळे उघडीस आला सदर प्रकार ची व्हिडिओ शूट करून पेट्रोल विक्री करणाऱ्या मुलाने पेट्रोलची चोरी करून पैसा ची लूट करीत असल्याचा कबुली जवाब दिला
संपूर्ण देशात पेट्रोलच्या किमतीने हाहाकार माजवले असून सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुस्किल केले आहे काहींनी या* *पेट्रोलच्या किमतीमुळे वाहने विकून टाकली आहे कारण पेट्रोल ने शतक पार करून 108 धावा काढल्या आहेत व सर्वसामान्यांचे गोर गरीब जनतेचे बजेट बिघडले आहे जनता या किमती विरुद्ध आंदोलन करीत आहेत आणि नेरी येथे ग्राहकांची पेट्रोल पंप वर लुटमार सुरू आहे सध्या नेरीत एकच पेट्रोल पंप सुरू आहे तोही प्रख्यात असा इस्सार पेट्रोलियम कंपनीचा या पेट्रोल पंपावर मशिन ऐवजी मापाच्या साहाय्याने पेट्रोल विक्री सुरू होती ग्राहक पेट्रोल घ्यायला यायचे आणि मापाणी घेऊन निघून जायचे परंतु प्रवीण दहीकर नावाचा तरुण आपले वाहन घेऊन आला असता त्याने पेट्रोल विकणाऱ्या मुलाला विचारले की मापाने पेट्रोल देऊ नको तेव्हा त्या पेट्रोल विकणाऱ्या मुलाने सांगितले की मशीन आणि मापाने सारखेच पेट्रोल येते घ्यायचे असेल तर घे नाहीतर जा बाकी ग्राहक गपचूप घेत आहेत तेव्हा त्या तरुणाने पेट्रोल 100 रुपयाचे मागितले आणि मापाने पेट्रोल गाडीच्या टॅन्क मध्ये टाकले परंतु पेट्रोल टाकत असताना प्रवीण च्या लक्षात आले की तो माप 500 ml चा आहे त्याने त्या मूलाला विचारले हा माप100 रुपयाचा कशा तर विक्री करणारा मुलगा 100 रुपयांचा सांगत होता प्रविनने त्याला तो माप मशीन ने मोजून द्यायला सांगितले पण तो अरेरावी करीत नकार देत होता पण अनेक ग्राहकांनी दबाव टाकताच त्याने मशीन सुरु करुन माप मोजले असता 79 रुपयांचा पेट्रोल मापात भरला आणि माप भरून खाली सांडला त्यामुळे ही चोरी ग्राहकांच्या लक्षात आली एका मापात तो ग्राहकांचे 21 रुपये चोरी करीत होता असा प्रकार नेहमीच आधामधात सुरू राहायचा असे अनेक ग्राहकांनी सांगितले नेहमीच या पंपावर ग्राहकांची गर्दी व वर्दळ असते त्यामुळे तो पेट्रोल आणि पैशाची चोरी किती करीत असेल याचा अंदाज बांधता येत नाही सदर चोरी बदल विचारले असता त्याने सांगितले की चोरी करावीच लागते एवढे कराच लागते कामाईसाठी असे सांगितले तेव्हा एक ग्राहकआपल्या भ्रमणध्वनिवर व्हिडीओ शूट करीत होता त्यामुळे यामध्ये पेट्रोल पंप मालकाचाही हात असल्याचे काही ग्राहकांनी बोलून दाखवले आहे कारण विक्री करणारा मुलगा असे प्रकार करतो तरी पण मालक त्याकडे दुर्लक्ष करीत होते म्हणजे या प्रकारात दोघांची साठगाठ असल्याचे दिसुन येथे
सदर पेट्रोल पंपावर फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच प्रवीण आणि त्याचे सहकारी वाहन चालक यांनी चिमूर पोलीस ठाणे गाठून तक्रारअर्ज दाखल करीत फसवणुकी आणि लूटमार करणाऱ्या पेट्रोल विक्री करणाऱ्या मुलाविरुद्ध तक्रार दिली सदर प्रकारचे तक्रार अर्ज उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा देण्यात आले असून या पेट्रोल पंपावरील मालकावर आणि विक्री करणाऱ्या मुलावर कडक कारवाई करून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जनतेनी केली आहे

