नागपूर विभागातील शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार कपिल पाटील प्रयत्न करणार

नागपूर विभागातील शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार कपिल पाटील प्रयत्न करणार 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे मो, 7038115037


शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष भास्कर बावनकर यांनी पुणे येथे घेतली भेट 

नागपूर विभागातील  शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिक्षक भारती प्राधान्य देऊन संघटन विस्तार सुरू आहे.नागपूर विभागातील समस्यांकरीता शिक्षण उपसंचालक नागपूर येथे तसेच जिल्ह्यातील शिक्षण प्रणाली व शिक्षकांच्या समस्या यावर निवारण सभेला शिक्षक भारती संस्थापक आमदार कपिल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष भास्कर बावनकर यांनी दिली.चंद्रपूर जिल्हा शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष भास्कर बावनकर यांनी पुणे येथे आमदार कपिल पाटील यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. जिल्ह्यातील शिक्षण प्रणाली ,कार्याचा आढावा, चंद्रपूर जिल्हा शिक्षण विभाग संबंधित अधिकारी यांची कार्यप्रणाली यावर चर्चा करण्यात आली.

 कोविड ची परिस्थिती सुधारल्यानंतर चंद्रपूर शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात शिक्षक समस्या निवारण सभेला आमदार कपिल पाटील यांना आमंत्रित केले असता त्यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले यामुळे शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील शिक्षकानी समस्या अडचणी संघटनेकडे देण्याचे आवाहन सुद्धा शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाउसाहेब पत्रे तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष भास्कर बावनकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler