ब्रेकिंग न्यूज़
वाघाच्या हल्यात इसम गंभीर जखमी
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे
9765874115
ब्रम्हपूरी
ब्रम्हपूरी तालूक्यातील मौजा हळदा येथिल इसम वाघाच्या हल्यात जखमी झाल्याची घटना घडली
जखमी मोतिराम रामदास ठाकरे वय ६० वर्ष हळदा येथिल रहिवासी आहेत.
सविस्तर असे कि मोतिराम रामदास ठाकरे हे नेहमी प्रमाने आपल्या म्हशी चराई करून सायंकाळी घराकडे परतिच्या वाटेने असतांना झूडपात दबा धरून बसलेल्या वाघाने मोतिराम वर हल्ला चढविला. मात्र मोतिरामच्या समय सुचकतेने वाघाच्या हल्यातुन कसाबसा सुटका केली. व वाघाला परतवुन लावल्याचे बोलले जात आहे. परंतू मोतिराम गंभिर जखमी झालेला आहे.
या वाघाच्या हल्याने मात्र सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे कारन या परिसरामधे हि वाघाच्या हल्याची चवथी ते पाचवी घटना आहे. ग्रामस्थनकडून नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची वारंवार मागनी करून त्या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करावा आणी वनविभाने जखमी मोतिरामला आर्थिक मदत करवी अशी मागणी ग्रामस्थनकडून होत आहे.
