रात्री घरासमोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञाताने जाळली.अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल : साखरखेर्डा येथील घटना.
------------------------------------------
समाधान बंगाळे।तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा
तालुक्यातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या .साखरखेर्डा येथील .वार्ड क्रमांक सहा मध्ये राहणारे . माजी निवृत्ती वायरमन .शामराव इंगळे .यांची काळ्या रंगाची घरासमोर उभी असलेली हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल .mh 28 . M7108,या क्रमांकाची गाडी .अज्ञात इसमाने .काल दिनांक 9 ऑगस्टला .रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान .पेटवून दिली .
त्यामुळे सकाळी जेव्हा इंगळे कुटुंबियांना जाग आली तेव्हा घरासमोर असलेली मोटर सायकल जळून पूर्णपणे खाक झालेली दिसली .
तेव्हा तातडीने शामराव इंगळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दाखल केली ...साखरखेर्डा पोलीस यानी पंचनामा करून अज्ञात इसमा विरोधात .कलम 435 नुसार गुन्हा दाखल केला आहे . त्यामुळे मोटरसायकलचे अंदाजे .तीस ते पस्तीस हजार रुपयाची नुसकान झाले आहे ...पुढील तपास .ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वैराळ करीत आहे
व मोटर सायकल जाळणारा आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे .
जिल्ह्यात वांहने जाळण्याचे सत्र सुरूच आहे आ. आमदार गायकवाड यांचे वाहन अज्ञातांनी जाळले होते व अशीच घटना आता साखरखेडा येथे घडली आहे.
