गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष जी येलेकर (आय,ए, एस )सर यांचा आदर्शमय विवाह स्वागत समारंभ,

 गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष जी येलेकर (आय,ए, एस )सर यांचा आदर्शमय विवाह स्वागत समारंभ,

संदीप कांबळे गडचिरोली 

शहर प्रतिनिधी9421318021

गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा. आशिषजी येरेकर (आय.ए.एस.) यांच्या विवाह स्वागत समारंभ गडचिरोली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी संपन्न झाला.या प्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली 


या प्रसंगी स्वतः येरेकर सर, सरांचे आई -बाबा व सौ. येरेकर मॅडम , यांनी येणाऱ्या सर्व अतिथी गणांचे स्वागत केले. भोजनासाठी सर्वांनाच त्यांनी व्यक्तीश: आग्रह केला. सर्व पाहुण्यांचे त्यांनी जातीने लक्ष देवून जेवण करवून घेतले


*मा.अशिषजी येरेकर सर यांनी आपल्या मित्र मंडळीना, कार्यालयीन आपल्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना 50-50 च्या संख्येत ३-४ दिवसाच्या कालावधीत दररोज संध्याकाळी निमंत्रित करून आपल्या लग्नाचे रिसेप्शन दिले. कोविड नियमांचे पालन करीत, शासन नियमांचे पालन करीत अतिशय साधेपणाने त्यांनी आपल्या लग्नाचा दिलेला हा स्वागत समारंभ खरोखरच आदर्शमय विवाह स्वागत समारंभ ठरला,सद्या गडचिरोली शहरात या स्वागत समारंभाची जोरदार चर्चा आहे हे विशेष,



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler