गडचिरोली ते चामोर्शी राज्य महामार्गाचे काम खुप संथ गतीने,

 गडचिरोली ते चामोर्शी राज्य महामार्गाचे काम खुप संथ गतीने,

कामाचा वेग वाढवून काम त्वरित पूर्ण करावा गडचिरोली करांची मागणी,


संदीप कांबळे 

गडचिरोली शहर प्रतिनिधी

9421318021


       मागील 3 वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या गडचिरोली ते चामोर्शी राज्यमार्ग 30 किलोमिटरचा आहे, खोदकाम करायला वेळ लागत नाही पण रोड तयार करायला की जनतेला खूप मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो,

इंदिरा गांधी चौक ते सेमाना देवस्थान पर्यंत तर रोड तर जणू जलतरण तलाव आहे की काय असा प्रश्न गडचिरोली कराना पडला आहे,

त्यातल्या त्यात खासदार,आमदार म्हणजेच लोकप्रतिनिधी कंत्रातदारांकडून टक्केवारी घेऊन स्वतःचे घर बनवण्यात गुंग आहेत की आपण लोकप्रतिनिधी आहोत की काय याचा विसर त्यांना पडलेला आहे,त्यामुळे कंत्राटदार खूप खूप धीम्या गतीने राज्यमार्गाचे काम करत आहेत,अश्या कंत्राटदाराला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा अशी मागणी गडचिरोली वासीय करीत आहेत,

कंत्राटदाराने जर येत्या काही दिवसात कामाचा वेग वाढविला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा गडचिरोली वासीयांनी कंत्रादारांना दिला आहे,,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler