प्रहार जनशक्ती पक्ष आरमोरी यांचे उपोषण काही दिवसासाठी स्थगित,,
संदीप कांबळे
गडचिरोली प्रतिनिधी
9421318021
आरमोरी नगरपरिषद मधील कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना मा. कामगार राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर सिंचन भवन येथे कामगार आयुक्त नागपूर, गडचिरोली चे कामगार आयुक्त आरमोरी नगरपरिषद च्या मुख्याधिकारी , मुख्य ठेकेदार , आणि कामगार प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कामगारांना कामावर घेण्याचे ठेकेदार व आरमोरी च्या मुख्याधिकारी यांनी सहमती दर्शवली व त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करून कामगारांना कामावर घेण्याचे आदेश मा. राज्यमंत्री यांनी दिले त्याप्रमाणे कामगार आयुक्त गडचिरोली यांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेशही दिले परंतु ठेकेदार आणि मुख्याधिकारी हे या आदेशाला न जुमानता व मा.राज्यमंत्री व आयुक्त यांच्या आदेशाची अव्हेलना करीत कामगारांना कामावर अजूनही रुजू करून घेण्यास असमर्थता दर्शवीली आहे त्यामुळे आता कामगारांनी मा. जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांच्याकडे न्यायासाठी दाद मागून योग्य न्याय देण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर दि.24/8/2021 पासून आमरण उपोषणला बसण्याचा इशारा दिला होता ,त्याप्रमाणे आज दि.24/08/2021ला आमरण उपोषण सुरू होण्याच्या मार्गावर असतांना आपल्या जिल्ह्यात कालच नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी मा. संजयजी मीना यांना याची माहिती मिळताच त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावून घेतले व मी कालच नव्याने रुजू झाल्याने मला याविषयी सविस्तरपणे माहिती नाही परंतु यावर मी सोमवार पर्यंत संबंधित अधिकारी वर्ग यांच्याशी चर्चा करून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीन तोपर्यंतच तरी हे आमरण उपोषण स्थगित करावे
अशी अपेक्षा आमच्याकडून त्यांनी व्यक्त केली तेव्हा आमच्या शिष्टमंडळाने कामगारांना ही माहिती दिली असता सर्वसहमतीने कामगारांनी सुद्धा मा. जिल्हाधिकारी यांच्या शब्दाचा मान राखत आमरण उपोषण सोमवार पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला . परंतु सोमवार पर्यंत योग्य न्याय मिळाला नाही तर पुन्हा आमच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.