शिवसेना वरोरा तालुका तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणेचा निषेध
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
शिवसेना तालुका वरोरा कडून आज दिनांक 24/08/2021 रोज मंगळवारला आंबेडकर चौक वरोरा येथे शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राने या नेत्याची जीभ घसरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या बद्दल अपशब्द वापरला. त्या निषेधार्थ म्हणून वरोरा तालुक्यातील शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राने यांच्या पुतळ्याला चपला मारून निषेध दाखवित नारायण राणे कोंबडी चोर आहे अशी घोषणाबाजी करीत नारे लावले. तसेच शिवसैनिकांनी राणेचा स्पेशल लोगो कोंबडी हातात घेऊन शहरात रॅली काढून वरोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीच्या घरी जाऊन शिवसैनिकांनी कोंबड्या सोडण्यात आल्या.त्यावेळी शिवसेनेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर रमेशभाऊ मेश्राम, शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे,शिवसेना जिल्हाचिटणीस मनिषभाऊ जेठानी, शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, उपशहर प्रमुख मनिष दोहतारे, युवासेना तालुका प्रमुख वरोरा भूषण बुरेले,शहर प्रमुख गणेश जानवे, शिवसैनिक अनिलभाऊ गाडगे,शिवसेना नगरसेवक मेश्राम ताई, रुयारकर ताई, सोहेल शेख .