बारावीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या गावी जाऊन सत्कार

 बारावीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या गावी जाऊन सत्कार


नेरी येथील लोक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा खास उपक्रम


चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी:-प्रविन वाघे, 

मो, 7038115037




       राज्यातील एच एस सी बोर्ड च्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात इयत्ता 12 वी बोर्ड परिक्षेच्या जाहीर झालेल्या निकाल मध्ये लोक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी  मधून प्रथम क्रमांक मिळविलेली कुमारी श्रुती सुधाकर शेंडे  (81.16 टक्के ) मु मोटेगाव  तर द्वितीय क्रमांक श्रुतिका आत्माराम सुकारे  (79.50 टक्के ) मोटेगाव तर तृतीय क्रमांक कु अंकित चंद्रशेखर बावणे (69.50टक्के) मोटेगाव या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा व आई वडील यांचा लोक विद्यालय व  कनिष्ठ महाविद्यालयच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.तसेच लोक महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या श्रुतीने 10 वि वर्गात लोक विद्यालय मोटेगाव येथे प्रथम प्राविण्य पटकवले होते

           विशेष उल्लेखनीय बाब अशी की नेरी येथील महाविद्यालयात नेरी व परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी शिकतात परंतु यावर्षी तिन्ही प्राविण्य मोटेगाव येथील विद्यार्थ्यांनी पटकीवल्या ने परिसरातुन त्यांच्यावर हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे याही वर्षी उज्जवल यशाची पंरपरा कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनचे सत्कार त्यांच्या गावी मोटेगाव येथे केले गेले  याप्रसंगी महाविद्यालयाचे श्री मोरेश्वरजी वासेकर राज्य शिक्षकेत्तर महामंडळ चे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रा डी इ हटवार प्रा कु संगिता ढोले प्रा कु ज्योती पिसे श्री अ बा पिसे मुख्यध्यापक मोटेगाव तसेच विद्यार्थ्यांचे आई वडील यांची उपस्थिती होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler