चिमुरमध्ये रानभाज्या महोत्सव तालुका कृषी विभागाचा उपक्रम
आदीवासी जागतीक दिनाचे औचीत्य
रानभाज्या स्टालचे उद्घाटन सभापती लता पिसे यांच्या हस्ते संपन्न झाले,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-प्रवीण वाघे,
मो, 7038115037,
चिमुर:-पावसाळ सुरु झाला की वर्षातुन एकदाच येनारा व अन्य कोणतेही किटकनाशक फवारणी न करता उत्पन्न होनारी रानभाजीचे महत्व लक्षात घेता कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी विभागाच्या वतीने चिमूर शहरात सोमवार ला रानभाज्या महोत्सवाचे आयोजन देशमुख कॉम्पलेक्स परीसरात करन्यात आले या रानभाज्या स्टाल चे उद्धघाटन पंचायत समीतीच्या सभापती लता पिसे यांचे हस्ते करण्यात आले
तालुक्यात पावसाळ्याच्या सुरवातीला रानभाज्या जंगलात व शेतशीवारात उगवील्या जातात या रानभाज्याची चव आणी औषधी गुण वेगळेच असतात या रानभाज्याची ओळख व महत्व लक्षात घेता शहरातील नागरीकांनी रानभाज्या खरेदी करन्यासाठी समर्थता दर्शविली होती तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव आयोजीत केला होता या रानभाजी महोत्सवामध्ये तालुक्यातील तिस ते चाळीस शेतकरी व बचत गटानी रानभाज्या विक्रीसाठी आनल्या होत्या शेतकऱ्यांच्या रानभाज्या विक्रीला शहरातील नागरीकांनी चांगला प्रतीसाद दर्शवीला यावेळी उपस्थित चिमुर पंचायत समिती सभापती लता पिसे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे मकृअ भोयर निखारे संपदा इंगुळकर कन्हाके आदी उपस्थीत होते

