समृद्धी महामार्गाच्या टिप्परला भिषण अपघात १३ जनांचा मृत्यु तर ३ गंभीर

समृद्धी महामार्गाच्या टिप्परला भिषण अपघात

१३ जनांचा मृत्यु तर ३ गंभीर

ओम जायभाये

सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव - दुसरबिड मध्ये समृद्धी कॅम्पच्सा जवळ झाला हा अपघात.

(प्राथमिक स्वरुपाची माहीती)


सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगावजवळ आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टिप्परचा भीषण अपघात झाला. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुसरबीड येथून समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.


या अपघातात इतरही काही मजूर जखमी झाले आहेत. या जखमी मजूरांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे. परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यातच अनियंत्रित टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाले. यामध्ये असलेले मजूर दूरवर फेकल्या केल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अद्याप मृतकांची ओळख पटली नाही.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler