कृषीदूतांनी शेतकऱ्यांना पटवून दिले शेततळ्याचे महत्त्व‌.

 कृषीदूतांनी शेतकऱ्यांना पटवून दिले शेततळ्याचे महत्त्व‌.                                                  


महाराष्ट्र न्यूज

मुख्य संपादक:-ज्ञानेश्वर लाड

७७९८०७१८७६



‌‌देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महारखेड येथे शेतकऱ्यांना शेत तळ्याचे महत्व पटवून दिले तसेच शेततळ्याचे होणारे फायदे उपयोग सांगून तेथील एक शेततळ्यात भेट दिली  पावसाच्या अनियमितपणा मुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो ,अशा वेळी या तळ्यात साठवलेले पाणी पिकास देता येते. तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीस जर शेततळ्यात पाणी साठवले असेल तर त्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून मर्यादित क्षेत्रात एखादे पीक घेता येईल. शेततळ्यातील पाण्याची खोली 3.0 मीटर एवढी गृहीत धरून लांबी व रुंदी 15.15 मिटर 99 मिटर घेतल्यास शेततळ्यात सुमारे 441000 लिटर पाणी त्यामुळे सामावू शकते. यावेळी  समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य नितीन मेहत्रे रावे समन्वय प्रा. मोहजितसिंग राजपूत प्रा सचिन सोळूके सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच यावेळी महारखेड गावातील प्रगतशील शेतकरी कृषी सन्मानित पुरस्कार शेतकरी संजय दत्तात्रय देवरे रमेश अवसरमोल आदी मान्यवर उपस्थित होते.समर्थ कृषी महाविद्यालयचे कृषिदूत  भागवत जाधव यांची उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler