दरोड्याचा प्रयत्न ठरला अपयशी सिंधी कॉलनी उमरेड येथील घटना

दरोड्याचा प्रयत्न ठरला अपयशी सिंधी कॉलनी उमरेड येथील घटना

उमरेड तालुका प्रतिनिधी 

मनोज चाचरकर 9970643453


उमरेड, सिंधी कॉलनी उमरेड मंगळवारी मध्यरात्री 1:40 वाजता च्या सुमारास अंगावर थरकाप उडविणारे  दृश्य एका महिलेचा डोळ्यासमोर आले, रात्री आठ ते दहा मिनिटे या वेळामध्ये दरोडेखोरांनी रात्री1वाजून 40 मिनिटांनी सिंधी कॉलनी उमरेड येथे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण दृष्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेले असून, या संपूर्ण उमरेड शहरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सिंधी कॉलनी परिसरात संपूर्ण आवारामध्ये सेवकराम, घनश्याम, महेश तोलानी  या तिन्ही बंधूंचा इमारती आहेत. मध्यरात्री सर्व गाढ झोपेत असताना, दरोडेखोरांनी सेवकराम तोलानी यांच्या  भिंतीवरून उड्या मारत थेट महेश तोलानी यांच्या इमारतीकडे आले. एकेक करीत सातही दरोडेखोर त्यांच्या इमारतीचा आवारात शिरले. खिडक्या दरवाजे तपासणी तपासीत इमारतीच्या आत प्रवेश कसा करता येईल याची धडपड दरोडेखोरांनी सुरू केली. सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यादरम्यान संपूर्ण परिसर गाढ झोपेत असल्याने कुणाचेही त्यांच्याकडे लक्ष नव्हते. तोलानी परिवारातील प्रिया तोलानी ज्या बेड बेडरूममध्ये टीव्ही बघत असताना, त्यांना खिडकीमध्ये टॉर्च चा प्रकाश चमकताना दिसला. त्यांनी लगेच  मुलाला व सुनेला आवाज दिला. मुलगा निकेश व सुनेने खिडकीमधून झाकून पाहिले असता त्यांना दरोडेखोर बाहेर दिसले. त्यांनी आरडाओरड केला,चोर ...चोर अशा आवाज सारीकडे घुमत असताना दरोडेखोर त्या ठिकाणातून पळून पसार झाले.

पोलीस स्टेशन उमरेड मध्ये लगेच फोन केला असता, पोलीस तातळीने लगेच पोहोचली. त्यांनी चारही दिशेने शोध घेतला असता संपूर्ण टोळी त्या एरिया मधून पसार झालेली होती.या संपूर्ण प्रकाराने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून सात जणांच्या या टोळी मुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सीसीटीव्हीची संपूर्ण पाहणी केली असता, बाहेर अनेक दरोडेखोर असल्याचे दिसून आले. कदाचित एखादी मोठी घटना घडण्याचे विघ्न टाळले. अशी ही बाबा सामोरा आली

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler