लहान भावाने मोठ्या भावाला केले जागेवरच ठार,
शेतीचा वाद बीतला जीवावर मुल तालुक्यातील घटना,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे मो, 7038115037
मूल :- शेतीच्या जुन्या वादामधुन लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना मूल तालुक्यातील सिंताळा येथे घडली. सिंताळा येथील रहीवाशी विश्वनाथ पुंजाराम वैरागडे (६५) आणि सुनिल पुंजाराम वैरागडे (४२) दोघेही सख्खे भाऊ दोघांमध्ये अनेक वर्षापासुन वडीलोपार्जीत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादामधुन लहान भाऊ सुनिल वैरागडे याने मोठा भाऊ विश्वनाथ वैरागडे याचा काटा काढण्यासाठी बरेच दिवसापासून टपुन बसला होता. आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विश्वनाथ गुरे घेवुन घराकडे जात असताना सिंताळा रेगडी मार्गावरील नाल्याजवळ पाळतीवर असलेल्या सुनिलने पाठीमागेहुन येवुन कुर्राडीने विश्वनाथच्या डोक्यावर वार केले. कुर्राडीचा वार एवढा जबर होता की विश्वनाथ जागीच गतप्राण झाला. घटनेची माहीती होताच ताबडतोब ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी सिंताळा येथे धाव घेतली असता आरोपी सुनील वैरागडे याला ताब्यात घेवुन मृतक विश्वनाथचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. माहितीनुसार पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत ठवरे हे करीत आहेत
