काजळसर-मोटेगाव बिटाच्या वनरक्षकाची बदली थांबवा मोटेगाव काजळसर खुंटाळा अडेगाव बोथली हरणी गोरवठ येथील नागरिकांनी मागणी

काजळसर-मोटेगाव बिटाच्या वनरक्षकाची बदली थांबवा मोटेगाव काजळसर खुंटाळा अडेगाव बोथली हरणी गोरवठ येथील नागरिकांनी मागणी

मुख्य वनसरक्षक चंद्रपूर  ,उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी,वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी ,यांना दिले निवेदन


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे 7038115037


चिमुर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या काजळसर मोटेगाव बिटातील वनरक्षकची बदली थांबवावी यासाठी मोटेगाव काजळसर खुंटाळा अडेगाव बोथली हरणी गोरवट येथील नागरिकांनी मुख्यवसरक्षक चंद्रपूर, उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी , वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय तळोधी याना ६५० नागरिकांच्या सह्यानिशी २७ आगस्टला निवेदन सादर केले, सदर काजळसर मोटेगाव बीटात श्रीकृष्ण नागरे हे वनरक्षक म्हणून मागील 3 वर्षापासून कर्तव्यावर असून त्यांच्या कार्यकाळात कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडला नाही त्यांची वागणूक ही चांगल्या प्रकारची असून त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे सर्वांना ते चांगली वागणूक देत असून आतापर्यंत त्यांनी वन संपत्ती चे जतन करून पर्यावरण संवर्धनासाठी चांगले कार्य केले तसेच या संबंधात  चांगले मार्गदर्शन करीत असतात परंतु मागील काही दिवसां पासून अजित सुकारे नामक व्यक्तीने त्यांच्याबदल खोट्या तक्रारी करून जनतेची आणि वनविभागाची दिशाभुल केली आहे खोटे आणि बनावट  कामाच्या तक्रारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आणि तश्या प्रकारचे निवेदन सादर करून वृत्तपत्रात वृत्त  प्रसारित करून हेतुपुरस्सर वनरक्षकांची बदनामी केली आहे परंतु या बिटातील सात गावातील नागरिकांनी ह्या सर्व प्रकारा ची दखल घेत अजित सुकारे यांनी चालविलेल्या वनरक्षकांची बदली करण्यासाठी चालविलेल्या उदव्यापाला थांबवण्यासाठी २७ आगस्टला वनविभागाच्या कार्यालयाला निवेदन सादर केले अजित सुकारे यांनां वनरक्षक नागरे यांच्या विरुद्ध गावातील 200 नागरिकांच्या सह्या घेतल्या आणि सामाजिक युवा ब्रिगेड संघटनांच्या माध्यमातून खोटे  निवेदन सादर केले  त्यामुळे नागरिकांनी या सर्व प्रकारात काही तथ्य नसल्याचे सांगितले वनरक्षक नागरे याना मानसिक त्रास देण्याच्या त्याचा हेतू आहे त्यामुळे या तक्रारीची दखल न घेता वनरक्षक नागरे यांची बदली थांबवावी असे निवेदन वनविभागाला दिले आहे  . निवेदन देत असताना  संदीप पिसे,पिंटू खाटीक,प्रदीप सुकारे, कनयासिंग भौड,विकास रामटेके, कमलेश मोटघरे,प्रभाकर दडमल,विशाल दडमल,हरिदास मडावी,देवा कावळे,शेखर हांडेकर, प्रेमदास बन्सोड,कैलास हटवादे, हर्षल कामडी,पवन मेश्राम आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler