मोटेगांव येथे डेंग्यू , मलेरिया प्रतिबंध औषधी फवारणी.

मोटेगांव येथे डेंग्यू , मलेरिया प्रतिबंध औषधी फवारणी.

अनिल भोयर मोटेगांव ९८२३५३४५५९

चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

चिमुर तालुक्यातील मोटेगांव येथे काल दिनांक २५-०८-२०२१ रोज बुधवार ला ग्राम पंचायत मोटेगांव यांच्या वतीने डेंग्यू , मलेरिया प्रतिबंध औषधीची फाॅंगीन मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.

    सद्य परिस्थितीत जगात कोरोना माहामारीने हाहाकार माजला असुन कोरोना सोबतच अनेक जीवघेण्या आजाराने डोके वर काढले आहेत. त्यातीलच डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजार हे डास चावल्याने हो असतात.डेंग्यू मलेरिया तापाची साथ सर्वत्र पसरली आहे .डासांची उत्पत्ती हि डबके ,सांडपाणी यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत असते.यावर प्रतिबंध म्हणून मोटेगांव ग्राम पंचायत कार्यालयाचे वतीने पुढाकार घेऊन संपूर्ण गावात प्रतिबंध म्हणून औषधांची फाॅंगीन मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.मोटेगांव येथील नवनियुक्त कर्तव्यदक्ष संरपंच श्री सुभाष नेवारे यांनी जातीने हजर राहून संपूर्ण गावात फवारणी करण्यात सांगितले व त्याचप्रमाणे ग्राम पंचायत कर्मचारी तेजराम ईंगुलकर यांनी सुद्धा मोलाचं योगदान दिले. करीता मोटेगांव येथील समस्त जनतेच्या वतीने ग्राम पंचायत मोटेगांव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका व संपूर्ण सदस्य गण यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler