भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना काळात सुखदुःखासाठी जीवाची पर्वा न करता केली सेवा .

भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना काळात सुखदुःखासाठी जीवाची पर्वा न करता  केली सेवा .

आमदार बंटीभाऊ भांगडीया. चिचाळा शास्त्री येथील रक्षाबंधन कार्यक्रम.


चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

सचिन वाघे मो.673767006




कोरोना च्या प्रादुर्भाव मुळे सर्वत्र बिकट स्थिती निर्माण झाली असून सन २०१२ पासून रक्षाबंधन कार्यक्रम सुरू केला होता. सन २०१९ च्या रक्षाबंधन कार्यक्रमात एवढी मोठी मातृशक्तीच्या उपस्थितीने प्रेम दाखवीत इतिहास निर्माण केला होता.  सन २०२० पासून कोरोना मुळे कार्यक्रम होऊ शकला नाही. बहिणी भाऊ कडे जात होत्या . परंतु यंदा भाऊ बहिणीकडे जाण्याचा निर्णय घेत गावोगावी बहिणीच्या भेटीला जाऊन राखी बांधून घेत आहे. मातृशक्तीच्या आशीर्वादाने आम्हाला शक्ती मिळत आहे.सन २०१४ पासून राजकारण सोबत सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून गोरगरीब मतदारांच्या पाठीशी खंबीर राहण्याचा संकल्प केला आहे. कोरोनाच्या महामारीत सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुखदुःखात सेवा करण्याचे कार्य केले असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी २०० मीटर चा रस्ता पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.चिचाळा शास्त्री येथील रक्षाबंधन कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते. यावेळी वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मुगले, समीर राचलवार ,लीलाधर बनसोड पस सदस्य प्रदीप कामडी ,कलिम शेख , बळवंत ठवरे, निलेश गभने, दीपाली बानकर , मंजुश्री ठोबरे,भारती हुलके, रत्नमाला मेश्राम रवी लोहकरे आदी उपस्थित होते. 

दरम्यान स्थानिक विकास निधी अंतर्गत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी व्यासपीठ बांधकाम साठी ५ लाख रु दिलेल्या निधीतील व्यासपीठ चे उदघाटन भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांचे हस्ते करण्यात आले. लहान मुलांनी स्वतः अर्ज करून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना दिले असता त्या लहान मुलांच्या समस्या तात्काळ मंजूर केल्या.शेवटी कोरोना मधील मृताम्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक सरपंच अरविंद राऊत यांनी करीत संचालन गोंडाने यांनी केले. मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler