केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे,बेरोजगारी व महागाई विरोधात शेतकऱ्यांनी पुकारालेल्या भारत बंदला ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसचा पाठींबा

 केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे,बेरोजगारी व महागाई  विरोधात शेतकऱ्यांनी पुकारालेल्या भारत बंदला ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसचा पाठींबा

ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी

मनोज अगळे

    9765874115


        केंद्रातील भाजप सरकारने बनविलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात मागील ११ महिण्यापासुन दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असुन अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. तरी शेतकऱ्यांसोबत केंद्रातील भाजप सरकार चर्चा करायला तयार नाही. तसेच  पेट्रोल,डीझेल,गॅस व खाद्य तेल व जीवणावश्यक वस्तूचे दरवाढी विरोधात केंद्र सरकार निषेधार्थ अनेक आंदोलन करण्यात आले तरी सुद्धा केंद्रातील भाजप सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आज दि.२७/९/२०२१ ला विविध पक्षाच्या संघटनानी भारत बंद च्या आंदोलनात ब्रह्मपुरी येथे व्यापारी संघटनेनी दुकाने बंद ठेवुन सहकार्य केले.  या पुकारलेल्या विविध पक्षीय शेतकरी आंदोलनात ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस निषेध रॅलीत सहभागी होऊन शिवाजी चौक ब्रम्हपूरी येथे नारेबाजी करुन केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.तसेच उपविभाग अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस, तालुका महिला काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेसचे व इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler