वरोरा तालुक्यात कोविड लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद तालुक्यात कोविड लसीकरणाचे 1 लाख 1 हजार 354 डोज केले पूर्ण

वरोरा तालुक्यात कोविड लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद तालुक्यात कोविड लसीकरणाचे 1 लाख 1 हजार 354 डोज केले पूर्ण

वरोरा तालुका प्रतिनिधी

गणेश उराडे 8928860058

वरोरा:- कोरोना ला थांबविण्या करिता संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोविड लसीकरणा ला शिबिराच्या माध्यमातून जिल्हाअधिकारी कार्यालय तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील तालुका स्तरावर शिबीरे राबवून कोरोनाला कसे हरवता येईल या साठी शासनाने कोविड लसीकरण चालू केले जिल्हाभरात लसीकरण तालुका पातळी ग्रामीन भागात चालू झाले वरोरा तालुक्यात या कोविड लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद लोकांचा आहे आजपर्यंत तालुक्यात 1 लाख 1 हजार 354 डोज तालुक्यात पूर्ण झाले. त्यात आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहायक आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तालुक्यातील पंचायत विभाग पोलीस विभाग महसूल विभाग यांचे सहकार्य लाभले.तालुक्यात लसीचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. 

   तालुक्यात 18 वर्षावरील लस पात्र लाभार्थी 1 लाख 34 हजार 493 असून त्या पैकी पहिला डोज 77 हजार 818 लोकांना पूर्ण झाला असुन दुसरा डोज 23 हजार 536 असे एकूण 101354 डोजेज पूर्ण झालेले आहे तालुक्यात पहिला डोजची टक्केवारी 58% तर दुसरा डोज 18% झालेला आहे. या सर्व लसीकरणाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रतीक बोरकर, प्रभारी तालुका अधिकारी डॉ. बाळू मुंजनकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राठोड उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler