ब्रेकिंग,,वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू ,गणपत भांडेकर 55 वर्षीय इसम ठार.

ब्रेकिंग,,वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू ,गणपत भांडेकर 55 वर्षीय इसम ठार.


गडचिरोली शहर प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021



 गडचिरोली पासून 8 किलोमीटर अंतर असलेल्या जेप्रा लगत असलेल्या जंगल परिसरात आज दुपारी 12 वाजता च्या सुमारास गणपत भांडेकर वय 55 रा, राजगाटा ,जेप्रा ही व्यक्ती गेली असता जंगलात दबा धरुण  बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले,

        श्री,मानकर साहेब मुख्य वनसंरक्षक यांनी वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी लिखित आश्वासन सुद्धा दिले होते, ताडोबा मधील शूटर सुद्धा मागील आठ दिवसापासून वाघाच्या शोधात आहे, 13 इसमाचा वाघाकडून हल्ला होऊन जीव जाणे म्हणजेच गडचिरोली करांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे, वनविभागाने जर कडक वाघाच्या बंदोबस्तासाठी उपाय योजना आखल्या नाहीतर असेच किती लोकांचा जीव जाईल हा खूप मोठा प्रश्न आहे,  बातमी लिहेपर्यंत वनविभागाची टीम घटना स्थळावर आली नाही.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler