नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी ठिय्या आंदोलनाचा आज 4 था दिवस जेल भरो आंदोलन करून झाली
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
सद्या गडचिरोली तालुक्यात चर्चेचा विषय असलेला नरभक्षी वाघ 11 लोकांचा जीव घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्ता साठी ,भारतीय जनसंसदेच्या वतीने व परिसरातील सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 4 था दिवस ,मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा उद्रेक करीत जेलभरो आंदोलन उभा केला,जेल भरो आंदोलन मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे मुख्य गेटवर करण्यात आला यात जवळपास 20 कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेतली,याप्रसंगी कार्यकर्त्यानी भारत माता की जय,वंदे मातरम,च्या घोषणा पण दिल्या,अटक होणाऱ्या कार्यकर्त्यांत प्रमुख श्री,विजयराव खरवडे जिल्हा प्रमुख,श्री नीलकंठ संडोकर,श्री योगजी कुडवे,श्री सचिन भुसारी,रमेश बांगरे प्रभाकर सूर्यवंशी,विलास झंझाड,चंद्रशेखर सिळाम,धंनजय डोईफोडे,रवींद्र सेलोटे,बंडूजी सोनवणे,दिनेश आकरे,शामलाबाई नैताम,सरस्वतीबाई पेंदाम,पुरुषोत्तम मठे,आदी आंदोलनकर्त्यांनी अटक करून घेतली,अडपल्ली,गोगाव,धुंडेशिवणी,चुरचुरा, राजगाठा चक, भिकार मौशी,दिभना,महादवाडी, जेप्रा, इंदिरानगर, इत्यादी गावावरून आलेले आंदोलनकर्ते खूप मोठ्या संख्यने जेल भरो आंदोलन करताना हजर होती,

