दि महाराष्ट्र अर्बन चा 8 वा वर्धापन दिन साजरा

दि महाराष्ट्र अर्बन चा 8 वा वर्धापन दिन साजरा

सावली तालुका प्रतीनीधी

उमेश गोलेपल्लीवार 7218949428

सावली येथील दि महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपुर कार्यालय सावली च्या मुख्य कार्यालयात दिनांक 1 सप्टेंबर ला  8 व्या वर्धापन दिन कोविड 19 मुळे पदाधिकारी, संचालक,कर्मचारी व दैनिक अभिकर्ता यांच्यात साधेपणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चरणदास बोम्मावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक सुनील बोमनवार, ऍड.धनंजय आंबटकर, प्रदीप ताटकोंडावार,अनुराग सुरमवार उपस्तीत होते.यावेळी झूम अँप द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी दैनिक अभिकर्ता व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.व नवीन योजनांचा शुभारंभ करण्यात आला.तसेच संस्थेचे अध्यक्ष चरणदास बोम्मावार, सुनील बोमनवार, ऍड.धनंजय आंबटकर यांनी सर्वाना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन व्यवस्थापक सूरज बोम्मावार यांनी केले.संचालन आरजू कुंटेवार यांनी तर आभार कविता तावाडे यांनी मानले.यावेळी योगेश सातरे,किरण गावडे,आशिष गेडाम,निलेश पुल्लावार,रविंद्र बोमनवार, रुपेश येनूरवार, सत्यवान मांदाळे, उल्हास डोंगरे,गिरीधर मेश्राम,प्रफुल लाटकर,लोकनाथ भोयर यांनी यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.वर्धापन दिनानिमित्त अनेक गणमान्य व्यक्ती,सभासद,ग्राहक यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler