प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र कवठी येथे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेविषयी मार्गदर्शन
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार मो 7218949428
दि.4/9/2021 ला सावली तालुक्यातील कवठी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यास सुधारणा व्हावी.जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावेत बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावे यासाठी केंद्र शासनाच्या महीला व बालविकास विभागाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात राबविण्यास मान्यता दिली.त्यानुसार 8 डिसेंबर 2017 पासुन महाराष्ट्र राज्यात ही योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महीलेस पाच हजार रुपये एवढी रक्कम बॅंक खात्यात जमा केली जाते.पहीला टप्पा 1000 रूपये . दुसरा टप्पा 2000 रूपये व तिसरा टप्पा 2000 रूपये याप्रमाणे जमा केली जाते.याप्रसंगी या कार्यक्रमांचे मार्गदर्शन आरोग्य साहाय्यक श्री ठिकरे सर . अध्यक्षस्थानी सौ. कांताबाई बोरकुटे ग्रामपंचायत सरपंच प्रमुख अतिथी राकेश घोटेकर ग्रामपंचायत सदस्य.मनिषा कोसरे ग्रामपंचायत सदस्य.संचालन आरोग्य सेवक कामडी सर तर आभार प्रदर्शन गटप्रवर्तक राजुरकर मॅडम यांनी मानले.

