श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे शिक्षक कार्य गौरव सप्ताहाचे आयोजन
अनिल भोयर ९८२३५३४५५९
चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सिदेवाही तालुक्यातील नवरगांव येथील नावलौकिक असलेल्या श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे दिनांक ०४-०९-२०२१ रोज शनिवारला शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला "शिक्षक कार्य गौरव "सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला ऊद्घाटक म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाकरे सर यांनी अध्यक्षीय स्थान भुषविले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डांगे सर ,गिरडकर सर , कुंभारे सर,देऊळवार सर, सोनवाने मॅडम ,वटपल्लीवार मॅडम उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात यामध्ये वक्तृत्व स्पर्धा ,काव्य वाचन स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . यामध्ये स्पर्धक म्हणून कुमारी जोत्सना मांदाळे ,रोशनी पराते,साईली मेश्राम या विद्यार्थ्यींनीनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाची अध्यक्षीय मार्गदर्शनाने सांगता करण्यात आली.कार्यक्रम समारोपीय आभार प्रदर्शन बोरकर सर यांनी मानले .या कार्यक्रमाचे यशस्वी करीता रोहीत रामटेके,भुषण मुंढरे व अन्य विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले..
