ब्रेकिंग,,वाघाच्या हल्ल्यात नामदेव गेचू गुडी 65 वर्षीय इसम ठार
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहर प्रतिनिधी
गडचिरोली पासून जवळ असलेल्या धुंडेशिवणी,करमठोला लगत असलेल्या जंगल परिसरात आज दुपारी 1 वाजता च्या सुमारास नामदेव गेचू गुडी वय 65 ही व्यक्ती पोळ्याचा सण असल्याने जंगलात पात्र बनवण्यासाठी लागणाऱ्या पानांची तोडणी करण्यासाठी जंगलात गेली,जंगलात दबा धरुण बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
गडचिरोली मध्ये 2 दिवस अगोदर भारतीय जनसंसद च्या वतीने 4 दिवस ठिय्या आंदोलन केले होते त्यात त्या आंदोलनाला श्री,मानकर साहेब मुख्य वनसंरक्षक यांनी वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी लिखित आश्वासन सुद्धा दिले होते,पण ही घटना ताजी असताना या इसमाचा वाघा कडून हल्ला होईन माणसाचा जीव जाणे यामुळे जनतेचा रोष खूप वाढला आहे.
या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आता ताडोबा मधून शूटर ना बोलवा अशी मागणी जोर धरत आहे,बातमी लिहेपर्यंत वनविभागाची टीम घटना स्थळावर आली नाही.

