अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेची कार्यकारिणी निवड संपन्न आमगाव येथे सभा संपन्न

अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेची कार्यकारिणी निवड संपन्न आमगाव येथे सभा संपन्न


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे

चिमूर:-अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेची सभा आमगाव येथे दि 26 सप्टेंबर ला कार्यकारिणी ची निवड करून संपन्न झाली या नाट्य कलावंत परिषदेची निर्मिती ही न्याय व हक्कासाठी करण्यात आली असून नाट्य कलावंतांना न्याय मिळावा यासाठी व शासनाने जो कलावंतांवर अन्याय केला आहे त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी या परिषदेची निर्मिती करून कार्यकारिणी ची निवड करण्यात आली 

मागील 2 वर्षांपासून रंगभूमीचा पडदा उघडलाच नाही त्यामुळे कालावंतांवर उपासमारीची पाळी आली असून अनेक कलावंत बेरोजगार झाले त्यांची कुटूंब उडवस्त झाली अनेक कलावंतांनी आत्महत्या सुद्धा केल्या परंतु अनेक निवेदने अर्ज विनंत्या करून सुद्धा शासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शासनापर्यंत नाट्य कलावंताच्या वेदना पोहचण्यासाठी या नाट्य परिषदेची निर्मिती करून कार्यकारिणी ची निवड करण्यात आली या परिषदेला 200 च्या वर रंगकर्मी नी हजेरी लावली होती आणि एकतेचा प्रदशन केला होता. या कार्यकारिणी निवडी मध्ये अध्यक्ष म्हणून शेखर पटले ,सचीव मुकेश गेडाम ,उपाध्यक्ष व संघटक किरपाल सयाम ,मा देवा कावळे,प्रियंका गायधने,किशोर भाग्यवंत,तर सह सचिव ज्ञानेश्वरी कापगते, वासूकुमार मेश्राम, सुनील कुकुडकर ,दुधाराम कावळे,सदस्य म्हणून शेरू खान ,विनोद काळे,प्रतिभा साखरे,शंभुदेव मुरकुटे,उत्तम उके,लालचंद पुंगाते तर कोषाध्यक्ष म्हणून संथनू कुळमेथे तर मार्गदर्शक म्हणून डाँ परशुराम खुणे अंबादास कामडी डाँ प्रा दिनकर चौधरी डाँ प्रवीण सहारे  प्रसिद्ध प्रमुख म्हणून राहुल पेंढारकर मंगल मशाखेत्री होमदेव कोसनसिले आदि मान्यवरची निवड एकमताने करण्यात आली या प्रसंगी अनेक कलावंतांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले यात अध्यक्ष शेखर पटले म्हणाले, की ही परिषद झाडीपट्टी रंगकर्मी यांच्या न्याय व हक्क अस्तित्वासाठी अविरत प्रयत्न करून लढा देत राहील ,तर सचिव मुकेश गेडाम यांनी सांगितले की झाडीपट्टी चा इतिहास व संस्कृती शासन दरबारी पोहचणे अत्यंत आवश्यक आहे ,तर संघटक देवा कावळे यांनी पारदर्शकता व प्रमाणिकतेला महत्व दिले जाईल असे मत व्यक्त केले अश्या प्रकारे नाट्य परिषदेची कार्यकारीणी ची निवड करून सभा संपन्न करण्यात आली  

       या नाट्यपरिषद कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डाँ परशुराम खुणे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य परिषद घेण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवा कावळे यांनी केले तर संचालन राहुल पेंढारकर यांनी केले या निवडीच्या कार्यक्रमाला 200 च्या वर कलावंत उपस्थित होते त्यामुळे कलावंत एकसंघ आहेत असे दिसून आले असा सुंदर योगायोग दिसून आला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler