नागपुर येथे प्रहार संघटनेच्या वतीने तीन शेतकरी विरुद्ध कायदे विरोधात आंदोलन.
महाराष्ट्र न्यूज संपादक
आशु लामसोगे 8855034555
नागपूर:- केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी व दिल्ली सीमेवरील कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी मागील 9 महिन्या पासून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा समर्थनार्थ नागपुर येथील प्रहार संघटना व किसान संघटना मिळुन सर्व कार्यकर्त्यांनी संविधान चौक नागपूर येथे येथे आंदोलन करून केंद्र सरकारच्या जाहिर निषेध नोंदवला या विरोधात जय जवान जय किसान, ईधन दरवाढ ईतर काही महागाई विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार नागपूर शहर प्रमुख राजेश बोढारे, उपाध्यक्ष रूश्री कुवर, सचिव नकुल गमे पाटील,महासचिव सचिन तरारे युवा अध्यक्ष आसिफ शेख,मध्य नागपुर अध्यक्ष शुभम उघाडे, मुकुल कोरकलाई,वाहन संघटना शहर अध्यक्ष विपीन कामळे,सुनिल धानोरकर, सचिन तराळे, रमेश दादा, गिता ताई मेहर, सुप्रिया ताई बुरडकर, अनु ताई गायकवाड, मोठया प्रमाणात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

