मद्यधुंद कार चालकाने दुचाकीस उडविले, एक गंभीर जखमी तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मद्यधुंद कार चालकाने दुचाकीस उडविले, एक गंभीर जखमी तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू 


गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

सतीश नेवारे मो. 8459432185


गोंडपिपरी :-  दिनांक 28 /9 2021 बल्लारशा वरून आला पलीकडे जाणारी चार चाकी क्रमांक DL 09 CAU 9750 बल्लारशा वरून राष्ट्रीय महामार्गावर जात असताना झरन टर्निंग वर गोंडपिपरी कडून येणाऱ्या दुचाकीस क्रमांक MH 34 U 3681 ला उडविले या अपघातात दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले,

         कोठारी पोलिसांकडून सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार जखमीं पैकी संदीप सुधाकर गौरकार वय वर्ष 24 रा. विठ्ठलवाडा तालुका गोंडपिप्री याचा उपचारार्थ मृत्यू झाला अशी माहिती मिळाली,बल्लारशा कोठारी मार्गाने आला पलीकडे कार जात होती कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याचा अपघात  कोठारीत होता होता. पुढे काही अंतरावर असलेल्या रहदारी पोलिसांना उडवणार होता मात्र थोडक्यात बचावला, सदर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झरण टर्निंग वर गोंडपिपरी वरून येणाऱ्या दुचाकीस उडविले सदर माहिती कोठारी पोलिसांना समजताच घटनास्थळावर तातडीने दाखल झाले अपघातातील कार मध्ये चालक एकटाच होता तो मात्र बचावला त्याच्या गाडीत विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या तो भरपूर प्रमाणात मद्यप्राशन करून होता तो व्यवसायाने अभियंता असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले,

      जखमींमध्ये कोमल धुडसे वय वर्षे 26 राहणार घडोली तालुका गोंडपिपरी यांचा उपचार ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे होत आहे. पुढील कारवाई कोठारी पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler