कृषी विद्यार्थीनींनी साकारली रांगोळी ने 'नेरी गावाची अप्रतिम प्रतिकृती

कृषी विद्यार्थीनींनी साकारली रांगोळी ने 'नेरी गावाची अप्रतिम प्रतिकृती


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


नेरी  येथे आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत गावाच्या आराखड्याचे प्रात्यक्षिक रांगोळांच्या साहाय्याने अप्रतिमरित्या गावकऱ्या समोर सादर केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ अकोला संलाग्नेत आनंद निकेतन - कृषी महाविद्यालय वरोरा येशील कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थीनी वेदांती ढोले आणि हर्षा वाघे यांनी गावकऱ्यांच्या सहभागाने गावाचा नकाशा रांगोळीने रेखांकित करून गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. गावाच्या विकासासाठी गावातील नैसर्गिक स्रोत, शेतजमीन, मुख्य ठिकाणे आणी गावातील समस्या त्यात शिक्षण आरोग्य पाणी ह्या महत्वाच्या समस्या कडे लक्ष वेधून गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने  लक्षात घेणे महत्वाचे आहे, असे सांगितले सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler