पर्यावरणाची हानी व पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी गौरी व गणपतीचे विसर्जन नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या हौदामध्ये

पर्यावरणाची हानी व पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी गौरी व गणपतीचे विसर्जन नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या हौदामध्ये 

गडचिरोली शहर प्रतिनिधी

संदीप कांबळे 9421318021



        हरितालिका निमित्याने अनेक महिला भगिनी गौरीचे विसर्जन करतांना नदी,तलाव व विहिरीमध्ये न करता नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या हौदामध्ये गौरीचे निर्माल्य विसर्जन करावे असे आवाहन नगर परिषदे मार्फत करण्यात आले होते,

                           सकाळी गौरीविसर्जन व त्यानंतर घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री बाप्पाची  प्रतिष्ठापना केली.यासाठी नगरपरिषदेकडून  निर्माल्य टाकण्यासाठी घंटागाडी,कचरापेटी,व ट्रॅक्टर नदीकाठी लावण्यात आली.गौरी पुजा साहित्य यांच्या पासून सेंद्रिय खत तयार करता येते. गौरी विसर्जनादरम्यान महिलांनी पूजा साहित्य आदी निर्माल्य हे नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यात न टाकता ते कचरापेटी, घंटागाडी व ट्रॅक्टरमध्ये टाकून नदी व तलावातील पर्यावरणाची हानी व पाण्यात होणारे प्रदूषण ताठावे असे आव्हान नगर परिषद प्रशासन गडचिरोली तर्फे करण्यात आले आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler