नेरी पोलीस चौकिला पूर्ण वेळ ऊप-नीरीक्षकासह पोलिस कर्मचारी नीयूक्त करा, नेरी येथील ग्रां,पं, प्रशासन व नागरीकांची मागणी

नेरी पोलीस चौकिला पूर्ण वेळ ऊप-नीरीक्षकासह पोलिस कर्मचारी नीयूक्त करा, नेरी येथील ग्रां,पं, प्रशासन व नागरीकांची मागणी

मागील एक वर्षापासुन कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नाही.


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे 

चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन आन्तर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकीचा कार्यभार सध्याच्या परिस्थितीत गेल्या एक वर्षापासून नेरी पोलीस चौकीचा कारभार पोलिस उप निरीक्षक श्री गायकवाड़ साहेब व चार पोलिस कर्मचारासाहित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे नेरी चौकीला ते कर्तव्यावर  रुजु झाले असुन गेल्या काही दिवसापर्यंत त्यांनी अनेक दिवस चौकीमध्ये नियमित पुर्न वेळ सेवा दिली.परंतु मागील काही महिन्यापासून चिमूर पोलीस स्टेशन येथेच त्यांना कामाला लावण्यात आले.आनी सध्याच्या परिस्थितीत ठाण्यात काम करतांना दिसुन येतात.त्यामळे नेरी येथे कायमस्वरूपी पुर्व वेळ उप-निरीक्षकासह पोलीस कर्मचारी हे चोवीस तास असावे. त्याचप्रमाणे नेरी पोलिस चौकिला 32 गावे समाविष्ट असून रात्रीच्या वेळेला एकही पोलिस कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, नेरी शहर हे व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाचे ठिकाण असून चिमूर पोलीस स्टेशन पासून अंदाजे अंतर हे अकरा किलोमीटर आहे, नेरी पोलिस चौकीपासुन पोलिस चौकी आन्तर्ग अंन्तर्गत येणारे गावे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असून रात्रीच्या वेळेला कोणतीही अनुचित घटना घडल्यास  चिमूर पोलिस स्टेशनला जाण्याकरीता रात्रीला कुठलेही वाहन ऊपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पोलिस स्टेशनला पोहचने शक्य होत नाही, पोलिस चौकिला रात्रिपालित पोलिस कर्मचारी राहत नसल्यामुळे अवैध धंदे वाइक सरसावले आहेत, व भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुद्धा दिसुन येत आहे नेरी चौकिला रात्री पोलिस कर्मचारी उपस्थित रहिल्यास अवैध धंदे, महिला अत्याचार, व नागरिकांना कोणत्याही प्रकरनाची तक्रार देण्यास कोणतीही अड़चन येणार नाही, व अपंग गोर गरीब शेतकरी शेतमजूर यांना चिमूर मुख्यालय येते न जाता नेरी चौकीतुन त्यांची तक्रार नोंदविली जाईल व तात्काळ पोलिसांना कार्यवाही करण्यात यश मिळेल. जनसामन्य नागरीकांना न्याय मीळन्यास सोपे होईल.या करीता  नेरी पोलिस स्टेशनला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करण्यात यावे, या करीता सदर चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार मनोज गभने हे 24/9/2021,रोजी नेरी येथे मस्कर्या  गणेश उत्सवाची आढावा घेण्यासाठी आले असता नेरी येथे ग्रामपंचायत प्रशासनासह गावकरी नागरीकांनी बैठकी दरम्यान काही प्रतीष्ठीत नागरीकांनी या विषयावर चर्चा केली की उपनिरीक्षक किरण मेश्राम यांनी आपल्या ४ पोलीस कर्मचार्यासह नेरी पोलिस चौकीला तीन वर्षे नियमीत पुर्ण वेळ देऊन सर्व एैवध्य धंदे,भुरटे चोर, छोटे, मोठे,डाॅन यांना धडा शीकवुन सर्वांना न्याय देत व्यवस्थित सांभाळल तर आता का अस होऊ शकत नाही असा प्रश्न ठाणेदार यांना उपस्थित केला.

अगोदर बंदोबस्त कमी होते आता छोट्याशा कार्यक्रमाला बंदोबस्ताची आमच्या कडे मागणी असतो त्यामुळे पोलीस स्टाफ कमी आहे.मात्र तुमच्या मागणीवर या विषयावर मि दोन दिवसात  निर्णय घेऊन नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियुक्ति करणार असून लवकरात लवकर आम्ही प्रक्रिया पूर्ण करू, पोलिस निरीक्षक मनोज गभने यानी आश्वासन दिले आहे. 

यावेळी उपस्थित सरपंच रेखाताई पिसे उपसरपंच चंद्रभान कामडी, ग्रामपंचायत सदस्य निखील पिसे, पिंटू खाटिक संदीप पिसे, त्याचप्रमाणे गावातील प्रतीष्ठीत नागरिक श्री अरुण पिसे, स्नेहदीप खोब्रागडे, किशोर ऊकुंडे, प्रवीण वाघे, अक्षय कामडी गावातील शेकडो नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler