गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमचा मृत्यू प्रकरणी एकास अटक
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर 9970643453
उमरेड, शहर तथा परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बहिणाबाई नगर उमरेड रहिवासी शुभम रमेश खंडार वय 28 वर्ष याच्या मृत्यू प्रसंगी उमरेड पोलिसांनी जोगीठाणा पेठ उमरेड निवासी संजय यादवराव भांनारकर वय 28 वर्ष यास अटक केली आहे. या गंभीर घटनेमुळे उमरेड शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असून त्यांचे उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गुन्हे असल्याने त्याला तडीपार ही करण्यात आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून उमरेड पोलीस स्टेशन हद्दीच्या कळमना शिवारातील पेंडराबोडी तलावामध्ये दिनांक 21 नोव्हेंबर दोन हजार वीस च्या रात्री दहा वाजताच्या सुमारास एक अनोळखी मृत्यू देह वय 25 ते 30 वर्षे वयोगटातील युवकाच्या प्रेत तलावाच्या पाण्यात तरंगत असताना दिसून आले अशी माहिती फिर्यादी मन्साराम तुळशीराम मेश्राम वय 56 वर्ष राहणार चिचघरे लेआउट उमरेड रहिवासी यांनी उमरेड पोलीस स्टेशनला दिली. यामुळे ऊमरेड पोलिसांनी प्रारंभिक अवस्थेमध्ये आकस्मित मूर्तीच्या गुन्हा दाखल केला.मृत अज्ञात युवकाचे प्रेत कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत आढळले त्याच्या हातावर त्रिशूल गोधलेले होते त्यामुळे उमरेड पोलिसांनी त्रिशूल चिन्ह व मृतकाच्या फोटो घेऊन शोध अभियान सुरु केला. तीन ते चार महिन्यानंतर युवकाची आई सीमा रमेश खंडारे ने मृतकांची ओळख करून हातावरील त्रिशूल चिन्ह व कपड्याची ओळख करून अज्ञात मृतक हा शुभम रमेश खंडार राहणार बहिणाबाई नगर उमरेड हाच माझ्या मुलगा असल्याचे खात्रीने सांगितले मृतकाच्या मोठा भाऊ लोकेश रमेश खंडारे वय 29 वर्ष यांनी 23/ 9 /2019 ला उमरेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली व त्या तक्रारी मध्ये आरोपी संजय भानारकर राहणार मंगळवारी पेठ हा वारंवार मृतकाच्या घरी येणे-जाणे होते त्यामुळे मृतक व आरोपी मध्ये वारंवार भांडण होत असे म्हणून संजय भानारकर ने मृतकाच्या घातपात करून हत्या करण्याची तक्रार नोंदवली त्यावरून उमरेड पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यांमध्ये कलम 302 चा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सखोल तपास करून आरोपी संजय भानारकरला उमरेड पोलिसांनी अटक केली आहे आज प्रथम न्यायदंडाधिकारी उमरेड यांच्या न्यायालयात आरोपीला हजर केले असता 29 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमध्ये फॉरेन्सिक लॅब ची टीम नागपूर,मृतकच्या निवासस्थाने चौकशीकरिता आली होती. या गंभीर घटनेमध्ये किती आरोपीच्या समावेश आहे याकडे उमरेड शहरवासीयांचे लक्ष लागले आहे सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांचा मार्गदर्शनात पो. उ. नि. बॅट्टूकलाल पांडे,कर्मचारी प्रदीप चवरे, राधेश्याम कांबळे,तिलक रामटेके,भूषण मदनकर , रुपेश महादूले करीत आहे.
