चिमुरचे ठाणेदार मनोज गभने चिमूर तालुका वासीयासाठी ठरले देवदूत.

चिमुरचे ठाणेदार मनोज गभने चिमूर तालुका वासीयासाठी ठरले देवदूत. 

गणेशोत्सव दरम्यान चिमुर परीसरातील वेगवेगळ्या गावांना दिल्या भेटी. 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


चिमूर पोलीस स्टेशनचे नवनवीन ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. मनोज गभने हे दिनांक 26/08/2021 रोजी चिमूर येथे कर्त्यव्यावर रुजू झाले. त्यांनी गणेशोत्सव दरम्यान चिमूर परिसरातील वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या दरम्यान नेरी येथून जवळच असलेल्या ऊसेगाव येथे  दिनांक 24/09/21 रोजी मस्कऱ्या गणेश स्थापना निमित्त पोलीस स्टेशन चिमूर चे पोलीस निरीक्षक श्री. मनोज गभने, सहा. पोलीस निरीक्षक श्री. मंगेश मोहोड, पोलीस नाईक कैलास आलाम यांनी पेट्रोलिंग दरम्यान सायंकाळी 06/00 वाजता मौजा उसेगाव येथे भेट दिली छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्या आग्रहासत्व गणेश मूर्तीची स्थापना केली. तसेच पदाधिकारी यांचे कडून झाडाचे रोपटे भेट स्वरूपात स्वीकारून पर्यावरण अबाधित राखण्याकरिता झाडे लावा पर्यावरण वाचवा हा मोलाचा संदेशही त्यांनी दिला. याकरिता ऊसेगाव येथील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष आनी गावातील बाळ गोपाल व गावकरी प्रामुख्याने हजर होते. 

त्याचप्रमाणे शिवनपायली येथे गणेश स्थापना करून गावकऱ्यांशी संवाद साधला असता गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सण, उत्सव साजरे करतात तसेच गुण्या गोविंदाने राहून किरकोळ स्वरूपाची भांडण तंटे गावातच मिटवितात अशी माहिती मिळाल्याने साहेबांना याबाबत अत्यानंद झाला व त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने शिवनपायली हे गाव दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी दिनांक 24/09/21 रोजी शिवनपायली येथील विविध जाती धर्माच्या पुढाऱ्याची पोलीस चौकी नेरी येथे संयुक्तिक बैठक घेऊन गावातील तरुण पिढीला वाव देण्यासाठी गावात वाचनालय सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच गावाच्या विकासासाठी व नविन पिढी घडविण्यासाठी आधुनिक शीक्षक व प्रशिक्षण त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्वीप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक एक होऊन दाखविल्यास यासाठी स्वतःच्या वेतनातील अर्धी रक्कम 1 वर्षापर्यंत खर्च करणार. असल्याचे आश्वासन दिले. ठाणेदार गभने साहेबांनी दिलेले आश्वासन यापूर्वी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले नसल्याने सर्वत्र त्यांचे चिमूर तालुक्यात समस्त पुरुष महीला बाल गोपाळांकडुन शुभेच्छांचा वर्षाव होऊन कौतुक केले जात आहे.यामुळे चिमूर तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler